Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वाईन अन् संगीतचा ‘सुला फेस्ट’1 आणि 2 फेब्रुवारीला

Share

नाशिक । गीत, संगीत, वाईनचे चषक आणि धम्माल मनोरंंजनाचा ‘सुला फेस्ट’ यंदा 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी वाईन कॅपटिल नगरी नाशिकमध्येच भरणार आहे.

जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असलेला ‘सुला फेस्ट’ संगीत महोत्सव 2020 यंंदा नाशिकमध्ये होणार की सुला विनियार्ड्सच्या बंगळुरू येथील प्रांगणात होईल याबाबत उत्सूकता आता संपुष्टात आली. तेराव्या सुला फेस्ट संगीत महोत्सव नाशिकला होणार असून 13 व्या हंगामाला दि. 1 फेब्रुवारी 2020 ला प्रारभ होणार आहे या संगीत महोत्सवामुळे जगभरातील पर्यटक नाशिकला दाखल होतात. येथील अर्थकारणाला चालना मिळते.

त्यामुळे अफवांना पूर्णविराम देतांना सुला विनियार्ड्स टीमने महोत्सव येथेच होणार असल्याचे स्पष्ट केले. वर्षीच्या महोत्सवात इको- फ्रेंडली संकल्पना अवलंबण्यासोबत स्थानिक व्यावसायिक, एनजीओ ला पाठबळ उपलब्ध करून देण्याचा ध्यास आहे.प्रामुख्याने ऊर्जा संवर्धन करण्यासोबत सौर ऊर्जेचा प्रभावी वापर, कमीत कमी प्रिंटिंग अशा विविध उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

स्थानिक व्यावसायिकांना पाठबळ देण्यासोबत यंत्रणेला सर्वोत्तपरी सहकार्य करण्याला आमचे प्राधान्य असणार असल्याचे सांगून सुला विनियार्ड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स) मोनित ढवळे म्हणाले. 2007 पासून महोत्सवाच्या निमित्ताने छाटणी (हरवेस्ट) हंगाम उत्साहात साजरा केला जातो आहे. दरवर्षी आलेल्या पाहुण्यांना अविस्मरणीय क्षणांची अनुभूती करून देतांना, सोबत सुला फेस्टच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील नामांकित कलावंतांचे या व्यासपीठावरून सादरीकरण होत असते. तसेच सहभागी संगीत प्रेमींचा वीकएंड अविस्मरणीय ठरतो.

यावर्षी महोत्सवात भारतातील पहिल्या ‘वाईन एक्सपीरियन्स झोन’ चा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून, या निमित्त वाईनसह भरगच्च उपक्रम राबविले जाणार आहेत. या क्षेत्राच्या माध्यमातून सुला फेस्ट या भारतातील पहिल्या फूड आणि वाईन फेस्टिव्हलद्वारे वाईन जनजागृती, साक्षरता निर्माण करण्याविषयी प्रयत्न केले जाणार आहे.

सालाबादाप्रमाणे भव्य आणि सर्वोत्कृष्ट आयोजन असलेल्या महोत्सवात यंदा मनोवेधक दृष्टीकोन जपला जाणार आहे. कलावंताच्या नावाची यादी लवकरच जारी केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. विनियार्ड्सच्या खुल्या प्रांगणात अँफिथिअटर येथे होणार्‍या मनोरंजनाने भरपूर असलेल्या, दर्जेदार संगीत, वाईन, ड्रिंक्स, खाद्यपदार्थ, फॅशन आणि खरेदीचा आनंद घेण्यासाठी संगीतप्रेमींनी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!