Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात 393 टँकर सुरु; 15 पैकी 13 तालुक्यात टँकर

Share

नाशिक । प्रतिनिधी
मान्सूनचे आगमन लांंबणीवर पडल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद होत आहे. जिल्ह्यात टँकरची वाटचाल चारशेकडे सुरु असून आज मितीला 393 टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. नाशिक तालुक्याचा अपवाद वगळता इतर 13 तालुक्यांमध्ये टँकर सुरु आहेत. सर्वाधिक टँकर हे नांदगाव तालुक्यात 78 इतके तर सिन्नर तालुक्यात 68 टँंकर सुरु आहेत. जिल्ह्यात टँकरने चारशेपर्यंत मजल मारण्याची ही पहिलीच वेळ ंठरली आहे.

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून पिण्याचे पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नदी, नाले, बंधारे आटले असून विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. पाण्यासाठी दाही दिशा भंटकती करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यांमधील धरणांमध्येही अवघा पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

त्यामुळे जिल्ह्याचा घसा कोरडा पडला आहे. सदयस्थितीत 15 पैकी 13 तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नाशिक तालुका टॅकर फेर्‍यास अपवाद आहे. 393 टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पुढील एक दोन दिवसात ही संख्या चारशेपर्यंत पोहचण्याची चिन्हे आहेत. नांदगाव, सिन्नर व येवला या तालुक्यांमध्ये टँकरचे अर्धशतक पूर्ण केले आहे.

ऐरवी 7 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असल्याने या कालावधीत टँकरची संख्या घटायची. मात्र, वळवाचा पाऊस सोडला तर जिल्ह्याला अदयाप मान्सूनची प्रतिक्षा आहे. दमदार पावसाच्या हजेरीला जून अखेर उजाडण्याची शक्यता आहे. ते बघता पुढील काही दिवस टँकरवरच जिल्ह्याची तहान भागविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

तालुकानिहाय फेर्‍या
बागलाण – 38
चांदवड – 22
दिंडोरी – 1
देवळा – 20
इगतपुरी – 12
कळवण – 0
मालेगाव – 58
नांदगाव – 78
नाशिक – 0
निफाड – 1
पेठ – 6
सुरगाणा – 16
सिन्नर – 68
त्रंबक – 8
येवला – 65

गाव – 287
वाडी – 925

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!