Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांवर ‘जल’संकट; गंगापूर धरणातील साठा घटला, एकवेळ पाणीपुरवठा होणार

Share

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा घटल्यामुळे दोन वेळा पाणी पुरवठा होत असलेल्या भागात आता एकवेळ पाणी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय आज महापालिकेकडून घेण्यात आला.

आज महापौर रंजना भानसी यांच्यासह विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील यांनी अधिकाऱ्यांसह धरणाची पाहणी केली.

यावेळी पाणी ज्क्वेलपर्यंत येण्यासाठी चर खोदण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. तसेच एकवेळ पाणी देताना पुरेस्या दाबाने पाणी कसे देता येईल याबाबतही योग्यप्रकारे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

15 जुलैपर्यंत पुरवठा होऊ शकेल इतके पाणी गंगापूर धरणात असून पाणी लिफ्ट करून किंवा चर खोदून जकवेलपर्यंत आणावे लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!