Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : दर गुरुवारची पाणीकपात रद्द; शहरात आता सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने करण्यात आलेली पाणी कपात अखेर रद्द करण्यात आली आहे. मात्र, नाशिक शहरात एकच वेळ पाणीपुरवठा होणार असल्याचेही महापौर म्हणाल्या.  आज महापौर रंजना भानसी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांपूर्वी महापौर भानसी यांनी दोन वेळ पाणीपुरवठा होत असलेल्या भागात एकवेळ पाणीपुरवठा केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाणीकपातीवर शिक्कामोर्तब करत पाणीकपातिची घोषणा दोन आठवड्यापूर्वी केली होती.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे धरणांतील पाण्याची पातळी वाढली असून दर गुरुवारी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा या आठवड्यापासून पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

मात्र, पाणीकपातीदरम्यान दोन वेळ पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला होता. ही पाणीकपात आहे तशीच ठेवण्यात आली असून यावर कुठलेही भाष्य महापौर यांनी केलेले नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!