Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

खुशखबर : नाशिकची पाणीकपात रद्द; शहरात दोन्ही वेळ येणार पाणी

Share

नाशिक | प्रतिनिधी

जून महिन्यात पावसाने दडी दिल्यानंतर नाशिक शहरात पाणी कपात लागू करण्यात आली होती.  दरम्यान, जुलै महिन्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्यानंतर गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी पाणीकपात रद्द केल्याची आज घोषणा केली.

आज महापालिकेत महापौर रंजना भानसी यांच्यासह आयुक्त राधाकृष्ण गमे बैठक पार पडली त्यानंतर पाणीकपात रद्दची घोषणा करण्यात आली.

३० जून पासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दर गुरुवारी पूर्णवेळ आणि इतर दिवस एकच वेळ पाणीपुरवठा करण्यात आला होता. दरम्यान, दर गुरुवारची पाणी कपात गेल्या काही दिवसांपूर्वी रद्द केली होती.

गंगापूर धरण आज ७९ टक्के भरल्यानंतर आज प्रशासानाकडून पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर आज नाशिकची पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!