Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

Video : नाशिकला हवे आहे दमदार नेतृत्व व मोठे उद्योग; ‘देशदूत’च्या ‘रणसंग्राम विधानसभेचा’ या चर्चासत्रात सूर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शासनस्तरावर मोठे उद्योग खेचून आणण्यासाठी खमके नेतृत्व नसल्याने अनेक उद्योग इतर शहरांमध्ये जात आहेत. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग आला नाही. जे आहेत तेदेखील आता बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे नाशिकला आता नवे उद्योग आले पाहिजेत. जे आहेत त्यांच्यासाठी सोयीसुविधा, पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे असा सूर देशदूत आयोजित रणसंग्राम विधानसभेचा या चर्चासत्रात उमटला.

यावेळी या चर्चासत्रात ललित बूब, गौरव धारकर, आदित्य गोगटे, मुकेश गुप्ता, मनीष रावल, डॉ. वैशाली बालाजीवाले आदींनी सहभाग घेतला. यावेळी नाशिकच्या विकासावर चर्चा करताना नाशिकसाठी दमदार नेतृत्वाची गरज असल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली. औद्योगिक विकासात मुंबई  पुण्यानंतर सर्वसुविधांनी परिपूर्ण नाशिक शहर असतानाही ते मागे पडले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आजही जमिनीचे दर नाशिकचे सर्वाधिक आहेत. नागपूरला दोनशे रुपये, चाकण पाचशे रुपये, मालेगाव आठशे रुपये, सिन्नर सोळाशे तर  दिंडोरी तीन हजार रुपये दर ठेवण्यात आले आहे.

#DeshdootFBLive महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि युवा औद्योगिक

Posted by Deshdoot on Saturday, 12 October 2019

दिंडोरीला मागणी असतानाही दर महागडे असल्याने उद्योजक गुंतवणूक करत नाहीत. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी विमानसेवा सक्षम असणे गरजेचे आहे. अटोमोबाईल इलेक्ट्रिकल उद्योगांसह आयटी क्षेत्रासाठी विमानसेवा अत्यंत गरजेची आहे. मात्र, शंभर कोटींची गुंतवणूक करूनही यंत्रणा पडून आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी साडेचार हजार कोटी रुपये होऊ शकतात मात्र, विमानतळ ते महामार्ग दरम्यानच्या पाच किमी रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही गती मिळत नसल्याने यात शासन प्रशासनाचा दोष आहे का? हे तपासावे लागणार आहे. मुंबईला जाणाऱ्या महामार्गावर कल्याण व भिवंडी येथे रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोन्हीती हालचाल होत नाही. यासाठी आवश्यकता आहे ती सक्षम नेतृत्वाची व जिल्ह्याच्या नेत्यांच्या संघटीत प्रयत्नांची. त्यातूनच उद्योग क्षेत्राचा विकास व पर्यायाने शहराच्या विकासाला गती मिळणे शक्य होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!