Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : वडाळागावात पत्रे पडून महिला ठार ३ जण जखमी

Share

इंदिरानगर । वार्ताहर : काल दि (८) सायंकाळी अचानकपणे सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे वडाळा गावातील एका घरावरचे पत्रे कोसळल्याने एक महिला ठार झाली आहे. यावेळी घरात असलेले तिघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत समजलेली माहिती अशी की वडाळा गावातील मेहबूब नगर या परिसरात राहणाऱ्या नासिम शेख (७०) यांच्या घराचे पत्र्यांवरचे दगड वादळामुळे पत्रासह कोसळले त्यातले दगड डोक्यावर पडल्याने त्यामुळे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याआहेत तर यावेळी घरात असलेले अन्य तिघे जण जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी व कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेऊन या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!