मखमलाबाद विद्यालयातर्फे पथनाट्याद्वारे मतदान जागृती अभियान

0

मखमलाबाद : मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता, तसेच स्री मतदार व नविन युवा मतदार यांच्यामध्ये जागृती होण्याच्या हेतुने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मखमलाबाद गावात प्रभातफेरी व पथनाट्याचे सादरीकरण केले.

प्रथम संपुर्ण गावातुन मतदान जनजागृतीचे फलक हातात घेऊन,घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली.त्यानंतर बसस्डँडवरती “माझे मत माझा हक्क ” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी मोठ्याप्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. पथनाट्यातुन मतदान प्रचाराविषयक घोषणा देण्यात आल्या. मतदानाचे महत्व, मतदान प्रक्रियेतील गैरमार्ग, नवीन मतदार नोंदणी, नवीन व्ही.व्ही.पॅट मशीन बद्दल माहीती, तसेच योग्य उमेदवाराला मत देऊन १००% मतदान करण्याचा संदेश देण्यात आला.

पथनाट्याच्या शेवटी मतदान आरती घेण्यात आली व गावातुन प्रभातफेरी काढुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.पथनाट्याचे लेखन,संकलन व मुळ संकल्पना उपप्राचार्या ए.ए.घोलप व जेष्ठ शिक्षिका ए.पी.गाजरे यांची होती. अभिनय व सादरीकरणासाठी जेष्ठ शिक्षिका पी.एस.शिंदे व वाय.एस.कासार यांनी मार्गदर्शन केले.

पथनाट्यासाठी संगीत साथ प्रशांत महाबळ,मतदार जागृती घोषवाक्य लेखणासाठी कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे, सुधीर तांबे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए.पी.गाजरे यांनी केले.त्यांनी गावकर्‍यांशी संवाद साधुन मतदान जागृतीविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य के.एस.गावले, उपप्राचार्या ए.ए.घोलप, पर्यवेक्षक एच.एस.दरेकर, शिक्षकवृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*