Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उमेदवार हा आदर्शांचे पालन करणारा हवा; मतदारांशी संवाद कार्यक्रमातील जेष्ठांचा सूर

Share

नाशिक : उमेदवार हा आदर्शांचे पालन करणारा असायला हवा, तसेच तळागाळातील समाजाप्रती जण असणे आवश्यक आहे, असा सूर येथील मतदारांशी संवाद या कार्यक्रमात दिसून आला.

यासाठीचे चर्चा सत्र हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मतदारांशी संवाद साधताना सांगितले कि उमेदवार हा आदर्श निर्माण करणारा असावा, जेणेकरून स्वतबद्दल तो पूर्वग्रहदुषित असता कामा नये. म्हणजेच त्याच्या नावे कोणताही गुन्हा नको, किंवा तत्सम विषयाशी तो निगडीत नसावा. तसेच उमेदवाराचा लोकसंपर्क दांडगा असावा. यामध्ये तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी त्याची नाळ जुळलेली असावी. जेणेकरून त्याला सामान्यातील सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक असते.

तसेच एका महिला मतदाराने सांगितले कि त्यास महिलांच्या प्रश्न माहिती असायला हवे, स्वच्छ चरित्र आणि कार्यक्षम असावा, उमेदवार सर्व भागात परिचित असावा, मनमिळवू, हुशार,अभ्यासू ,कल्पक व लोकांचा अडचणी सोडवणारा हवा.

तर यातील एका जेष्ठ म्हणाले कि तो स्पष्ट धडाकेबाज कार्यकुशल कणखर नेतृत्व असणारा हवा. जेणेकरून त्याने विधानसभेत आपले प्रश्न मांडले पाहिजे. एकूणच या चर्चेतील सूर असा होता कि, येणाऱ्या काळात मतदान होईल सर्वांनीच मतदानाचे कर्तव्य पार पाडत योग्य उमेदवार निवडसून द्यावा असे आवाहन करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!