Type to search

Breaking News टेक्नोदूत नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या

०१ डिसेंबरपासून इंटरनेट डेटा महागणार; जाणून घ्या सविस्तर

Share

नाशिक : जगभरात सर्वात जास्त इंटरनेट डेटा भारतात वापरला जातो. पण आता या इंटरनेट डेटा साठी अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण येत्या ०१ डिसेंबरपासून व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या दोन कंपन्यानी डेटासाठीचे दर वाढवत असल्याचं जाहीर केले आहे.

दरम्यान व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या दोन टेलिकॉम कंपन्यांनी आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलर्सचा तोटाझाल्याने हे पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रिलायन्स जिओचे बाजारात आगमन. जिओमुळे ग्राहकांना सर्वात स्वस्त प्लॅन मिळेल सोपे झाले. त्यानंतर सलग तीन वर्ष ही परिस्थिती असल्याने जिओच्या ग्राहक संख्येत वाढ होत गेली. यामुळे व्होडाफोन आणि एअरटेल कंपन्यांची स्थिती ढासळली .

त्यानंतर या कंपन्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं कि आम्ही डेटा दरात वाढ करत आहोत. याचे कारण असे की, मोबाईल कंपन्या आणि सरकारमध्ये वाद असून या कंपन्यांना येणाऱ्या उत्पन्नातून काही हिस्सा सरकारला द्यावा लागतो. परंतु दरम्यानच्या काळात या दोहोंमध्ये वाद झाल्याने हा वाद थेट सुप्रीम कोर्टात गेला. त्यानंतर हा निकाल सरकारकडून निकाल लागल्याने परिणामी या कंपन्यांना भुर्दंड बसत आहेत. त्यामुळे आता मोठी रक्कम सरकारला देणं असल्याने हि भरून काढणायसाठी दरवाढ हा एक पर्याय असल्याने कंपन्यांनी हा मार्ग निवडला आहे.

दरवाढ किती होणार, कशी होणार याबाबत अजून कोणतीही घोषणा कंपन्यांमार्फत करण्यात आली नाही. भारतीय बाजारपेठेत स्पर्धा अधिक असल्याने इतर कंपन्यांचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार आहे. फोनकॉल्स , एसएमएस आणि मोबाईल इंटरनेट डेटा यांच्या दरात वाढ होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!