Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा २०१९ : मतदान करा आणि दाढी कटिंग मध्ये ५० टक्के सूट मिळवा; सलूनवाल्याची खास ऑफर

Share

नाशिक : एकीकडे प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढण्यासाठी आवाहन करण्यात येत असतांना दुसरीकडे शहरातील एका सलूनमध्ये ५० टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे.

दरम्यान राज्यात उद्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार असून यासाठी जिल्हाभरात मतदारांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली होती. यामध्ये एका सलूनवाल्याने नामी शक्कल लढवत विधानसभा निवडणुकीत मतदान करून येणाऱ्या नागरिकास दाढी कटिंग मध्ये ५०% सूट दिली जाणार आहे.

पंचवटी परिसरातील रामवाडी येथे राहणारे प्रभाकर सैंदाने यांचे हे सलून असून त्यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ही शक्कल लढवल्याचे सांगितले. त्यांनी दुकानात जो ग्राहक मतदान करून दाढी कटिंग करण्यास येईल त्यास चक्क ५० टक्के सूट दिली जाणार फलक त्यांनी दुकानाबाहेर लावले आहे.

या दोन्ही दुकानांची शहरात जोरदार चर्चा होत असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील त्यांनी ग्राहकांना ही सवलत दिली होती. सदर सवलत ही मतदानाच्या दिवसापूर्ती मर्यादित असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!