Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा २०१९ : चांदवडमध्ये यंदा ‘शिरिष’ बहरणार का ?

Share

नाशिक । स्व.डॉ.डी.एस.आहेरांची पुण्याई व गतवेळी लाटेत आमदार झालेले डॉ.राहुल आहेर यांच्यासाठी यंदाची निवडणूक अवघड बनली आहे. गेली पाच वर्ष चांदवडकडे झालेले दुर्लक्षामुळे प्रांतवाद हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तर, शिरिष कोतवाल व उत्तमबाबा भालेराव हे दोन्ही नेते यंदा एकत्र आल्याने नातेगोत्याची गोळाबेरीज जय पराजयात महत्वाची भूमिका बजाविणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फिरलेले वातावरण बघता मतदारसंघात जनता ‘सर्जरी’करेल अशी दाट शक्यता आहे.

चांदवड – देवळा मतदारसंघात गतवेळी मोदी लाट असताना भाजपचे डॉ.आहेर विरुध्द काँग्रेसचे शिरिष कोतवाल यांच्यात काट्याची लढाई पहायला मिळाली होती. डॉ.आहेर हे जेमतेम 11 हजार मतांनी कसेबसे निवडूण आले होत. गतवेळी युती – आघाडी तुटली होती. त्यात एकटया चांदवडमधून शिरिष कोतवाल यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात होत. परिणामी चांदवडमध्ये मतांची झालेली फाटाफूट डॉ.आहेर यांच्या पथ्यावर पडली व त्यांची लॉटरी लागली होती.

त्यातही कोतवाल हे कॅाग्रेसकडून तर उत्तमबाबा हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. यंदा मात्र, चांदवड व देवळ्याच्या विकासासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहे. त्यामुळे कोतवाल यांचे पारडे जड मानले जात आहे. तर, डॉ.आहेर यांच्यासाठी गतवेळी माघार घेतेलेले जिल्हां बँकेचे अध्यक्ष व त्यांचे चुलत बंंधू केंदा आहेर हे यंदा इच्छूक होते. मात्र, यंदा देखील त्यांना इच्छा नंसताना माघार घ्यावी लागली. आहेर कुटूंबातील ही भाऊबंदकी निकालावर परिणाम करु शकते, अशी चर्चा आहे.

त्यातही आहेर बंधूची देवळ्यात दहशत आहे. मागील पाच वर्षात डॉ.आहेर यांनी देवळ्याच्या तुलनेत चांदवडला सावत्र भावाची वागणूक दिली. चांदवडमध्ये रस्ते, पर्यटन, पाणी योजना हे मुलभूत प्रश्न जैसे थे आहे. तर, मतदारसंघाला मिळालेला निधी एकटया देवळ्यात नेण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी प्रांतवादाला खतपाणी मिळाले असून चांदवडमध्ये डॉ.आहेर यांच्याविरुध्द रोष पहायला मिळत आहे.

देवळ्याची जागा डेजर झोनमध्ये
भाजपाने अंतंगर्त सर्व्हेनूसार राज्यातील ज्या जागा डेजर झोनमध्ये आहेत त्यात देवळा – चांदवडच्या जागेचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभा घेत देवळ्याला मंत्रीपदाचे ‘गाजर’ दाखविल्याचे बोलले जाते.

कांदा रडवणार
चांंदवड ही कांद्यांची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी शेतकरी मोठया प्रमाणात कांदा उत्पादन घेतात. यंदा शेतकर्‍यांना चार पैसे जादा मिळतील अशी शक्यता असताना केंद्रातील भाजप सरकारने कांदा निर्यातबंदी केली. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. त्यामुळे निवडणुकीत कांदा महत्वाचा मुद्दा आहे.

चांदवड ठरवतो आमदार
देवळ्यात मतदारांची संख्या ही 1 लाख 7 हजार आहे. तर, चांदवडमध्ये 1 लाख 72 हजार मतदार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रांतवाद हा महत्वाचा मुद्दा आहे. गतवेळेचा अपवाद सोडला तर चांदवडनेच या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!