Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निवडणूक खर्चासाठी २६ कोटी पंचवीस लाखांचा निधी प्राप्त

Share

नाशिक ।  प्रतिनिधी
जिल्हा निवडणूक शाखेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. शासनाकडून जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चासाठी २६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हे सर्व अनुदान विधानसभा निवडणुकीच्या तत्काळ लागणार्‍या बाबींचा खर्च भागविण्यासाठी देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या २१ ऑक्टोंबरला मतदान होणार आहे; तर २४ ऑक्टोंबरला मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांकडून युती व आघाडीची चर्चा सुरू असून याद्या जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

राजकीय पक्षांच्या तयारीसोबतच आता प्रशासकीय यंत्रणेचीही लगबग सुरू आहे. आपला खर्च भागविण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी शासनाने ४९५ कोटींचे वितरण केले आहे. प्रत्येक जिल्ह्यास निवडणूक खर्चासाठी निधीचे वाटप केले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यास दोन पत्रांद्वारे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

एका पत्राद्वारे २२  कोटी ५० लाख रुपये तर दुसर्‍या टप्प्यात ०५ कोटी ७५ लाख असे मिळून २६ कोटी २५ लाख रुपये प्राप्त झाले आहे. त्यात अत्यावश्यक तत्काळ खर्चाच्या बाबींसह दर महिन्याच्या खर्चाच्या बाबींवरही यातून पैसे खर्च करता येतील. बाबनिहाय खर्च आणि त्याचे प्रमाणपत्र मात्र लागलीच सादर करणेही बंधनकारक केले आहे.

तसेच दरमहिन्याच्या 5 ताऱखेलाच हा खर्च अद्यावत करावयाचा असल्याचे या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. खर्चाचा बाबनिहाय तपशील सादर करण्याचे आदेशही राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दिले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!