Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

Video : ‘मी मतदान केलं, तुम्ही केलं का; लोकप्रतिनिधींनी केले मतदान

Share

नाशिक : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया राज्यभरात सुरु असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी मतदान करत ‘मी मतदान केलं, तुम्ही केलं का? असे आवाहन त्यांनी इतर मतदारांना केले आहे.

दरम्यान जिल्ह्यात एकूण ४५ लाख ४४ हजार ६८१ इतके मतदार मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात १४८ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी मतदान प्रक्रिया सुरळीत चालू असून जिल्ह्यात तीन तासांत ६.५० % मतदान झाले आहे. यामध्ये अनेक मान्यवरांनी मतदान करत मतदान कर्णयसाठी इतर मतदारांना आवाहन केले आहे.

Video : 'मी मतदान केलं, तुम्ही केलं का; लोकप्रतिनिधींनी केले आवाहन

नाशिक : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया राज्यभरात सुरु असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी मतदान करत 'मी मतदान केलं, तुम्ही केलं का? असे आवाहन त्यांनी इतर मतदारांना केले आहे.त्यामध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि त्यांची पत्नी,नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि त्यांची पत्नी येवला विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर आणि त्यांच्या पत्नी, राज्यमंत्री दादाजी भुसे आदीसह अनेक मान्यवरांनी तसेच उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Posted by Deshdoot on Monday, 21 October 2019

त्यामध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि त्यांची पत्नी,नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि त्यांची पत्नी येवला विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर आणि त्यांच्या पत्नी, राज्यमंत्री दादाजी भुसे यांचे कुटुंबियांसोबत मतदान, काँग्रेसचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे,

नाशिक पश्चिमचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे, नाशिक पूर्व ची काँग्रेसची उमेदवार डॉ. हेमलता पाटील, मनसेचे उमेदवार दिलीप दातीर, भाजपचे उमेदवार राहुल ढिकले, मनमाड वंचितचे उमेदवार राजाभाऊ पगारे, भाजपाची उमेदवार डॉ. सरोज अहिरे काँग्रेसचे निलेश खैरे, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार योगेश शेवरे व देवळाली मतदारसंघातून वंचितचे उमेदवार गौतम वाघ आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!