Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा २०१९ : मतदान प्रकियेसाठी साहित्यासह कर्मचारी बुथवर

Share

नाशिक : विधानसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान प्रकियेसाठी मतपेटयांसह कमर्चारी बुथकडे रवानाझाले आहेत. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज सकाळपासूनच मतपेट्या वितरित करण्यात येत होत्या. तसेच वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली होती. यावेळी कर्मचारी आपल्या वाहनासह मतदान केंद्राकडे रवाना झाले.

दरम्यान जिल्हयातील पंधरा विधानसभा मतदार क्षेत्रातील मुख्यालयी मतदान कामी नियुक्त कर्मचारी अधिकारी उपस्थित झाले होते. त्या अधिकारी कर्मचार्‍यांना नियुक्त मतदान केंद्रावर विहीत वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येवून मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्हयात १५ विधानसभा क्षेत्रात- मतदान केंद्र आहेत. या मतदान प्रकियेसाठी केंद्रावर – अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना बुथ निहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात येवून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.

मतदान केंद्रावर मतदान साहित्य पोचवण्यासाठी व परत आणण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय परीवहन महामंडळाच्या बसेस वाहन चालकांची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच खाजगी वाहनांचा देखील उपयोग करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!