Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

PhotoGallery : सखी मतदान केंद्रावर सखींची लगबग

Share

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या आज सकाळी सातवाजेपासून उत्साहात सुरूवात झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान जिल्ह्यात पंधरा सखी मतदार केंद्र असून या ठिकाणी महिलांची सकाळपासूनच गर्दी दिसून आली.

दरम्यान सखी मतदान केंद्र महिलांसाठी असून या माध्यमातून महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर सखी महिला केंद्र उभारले आहेत. या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या केंद्रांवर १०० टक्के मतदान व्हावे, असा मानस निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक प्रक्रियेत महिलांचा अधिक सहभाग घ्यावा, यासाठी “सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे” च्या रूपात विशेषव्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग नोंदविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सदर चा अभिनव उपक्रम माननीय जिल्हाधिकारी नाशिक श्री सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे

सखी मतदान केंद्रावर ‘कामकाजात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी मतदान केंद्र’ही आहे. त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन महिलांच्या हाती असेल. या मतदान केंद्रात सखींकडून १०० टक्के मतदानाची अपेक्षा आहे’, असे मत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!