Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

टिटोली येथील सखी मतदान केंद्रात औक्षण करत स्वागत

Share

इगतपुरी : इगतपुरी येथील टिटोली येथे सखी मतदान केंद्र उभारले असून या ठिकाणी महिला मतदारांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. दरम्यान इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील २८८ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू झाले आहे.

सखी मतदान केंद्र महिलांसाठी असून या माध्यमातून महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर सखी महिला केंद्र उभारले आहेत. या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या केंद्रांवर १०० टक्के मतदान व्हावे, असा मानस निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गोलदरी ह्या संवेदनशील मतदान केंद्रांवर प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. इगतपुरी तालुक्यात २ ठिकाणी सदोष मतदान यंत्र तातडीने बदलण्यात आले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायत आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष व्यवस्था केली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवरील व्यवस्थेचा वापर करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!