Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पावसाच्या सावटामुळे मतदान केंद्रावर कापडाचे आच्छादन; मतदारांमध्ये निरुत्साह

Share

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यातील वातावरण नभाच्छादित बनले आहे. रविवार पासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून आज (दि.२१) देखील सर्वच भागात ही परिस्थिती कायम आहे.

पावसाळी परिस्थितीमुळे आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर देखील परिणाम होण्याची भीती आहे. पावसाचे वातावरण असल्याने मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सकाळ पासूनच राजकीय पक्ष व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. तसेच काही ठिकाणी कापडाचे आच्छादन टाकून मतदान सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान अनेक पावसाला न जुमानता सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी होती. तर काही ठिकाणी कामगारांना कामावर जायचे असल्याने सकाळी अंधारलेलं असतांना मतदारांनी रांगा लावल्या दिसून आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!