Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

नाशिक पूर्व मध्ये पुन्हा मतमोजणी थांबवली

Share

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघात ९ व्या फेरीला गणेश उन्हावणे यांनी मशीन बदलल्याचा आरोप करत मतमोजणी वर हरकत नोंदवली तसेच मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी या ठिकाणी येऊन यावर हरकत घेत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली.

दरम्यान नाशिक पूर्व ची मतमोजणी सुरु असून या ठिकाणी भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर आहेत. यावेळी उमेदवार गणेश उन्हवणे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी आक्षेप घेत मतमोजणी थांबवावी असे सांगितले. येथील ३० मशीन बदलण्यात आले मात्र एकावरही भाजप वगळता सह्या न घेतल्याने हरकत नोंदवण्यात आली मात्र हे अर्ज फेटाळून लावत मतमोजणी सुरू करण्यात आली.

यासाठी हरकती घेण्यात आल्या परंतु अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळून लावत मतमोजणी सुरु केली. पुन्हा दोन फेऱ्यानंतर मतमोजणी थांबविण्यात आली आहे.  नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीत तणाव निर्माण होऊ लागल्याने पोलिसांनी जादा कुमकी मागविण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!