Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा २०१९ : उद्या दुपारी 12 पर्यंत उधळणार विजयाचा गुलाल

Share

नाशिक । जिल्ह्यातील 15 जागांसाठी गुरुवारी (दि.24) मतमोजणी होणार असून साधारणत: दुपारी बारा वाजेपर्यंत जय पराजयाचे चित्र स्पष्ट होऊन विजयाचा गुलाल उधळला जाईल. नाशिक पूर्वमध्ये सर्वात कमी मतदान झाले असल्याने या जागेचा निकाल सर्वात आधी लागणार आहे. दरम्यान, निवडणूक शाखेकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

राज्यातील 288 जागांसाठी सोमवारी (दि.21) मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 15 जागांसाठी एकूण 62 टक्के मतदान झाले. आता निकालाकाडे जिल्ह्याचे लक्ष लागून असून दिवाळी अगोदरच जय पराजयाचे जोरदार फटाके फुटणार आहे. जिल्ह्यात 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 14 टेबलावर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षक असे तीन अधिकारी असतील.

सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. स्ट्राँगरूम खोलून तेथील ईव्हीएम मशीन मतमोजणी ठिकाणी नेण्यात येतील. सर्व प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. एक तासात म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनचे सील काढले जाईल व मतमोजणीला सुरुवात होईल. या ठिकाणी मतमोजणी अधिकारी व राजकीय पक्षाने ज्यांची नावे दिली असेे प्रतिनिधी यांनाच प्रवेश असेल.

साधारणत: एका फेरीसाठी अर्धातासाचा वेळ लागले. प्रत्येक फेरीनंतर निकालाची घोषणा केली जाईल. साधारणत: दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. नाशिक पूर्वमध्ये सर्वात कमी म्हणजे 47 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे या ठिकाणचा निकाल सर्वात आधी लागण्याची शक्यता आहे.

व्हीव्हीपॅट मतमोजणी
ईव्हीएमद्वारे मतदान मोजणी पूर्ण झाल्यावर व्हीव्हीपॅट मतदानाची मोजणी करुन पडताळणी केली जाईल. प्रत्येक मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी होईल. या प्रक्रिया किचकट असल्याने त्यास एक ते दीड तासाचा कालावधी लागेल. लोकसभा निवडणुकीत एकतर्फी निकाल लागल्याने व्हीव्हीपॅट मोजणीकडे उमेदवारांनी पाठ फिरवली होती. मात्र, यंदा ईव्हीएम मतमोजणीत जय – पराजयाच्या अंतरात फारसा फरक नसेल तर व्हीव्हीपॅट मतमोजणी निर्णायक ठरेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!