Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

भगूर : इव्हीएम सील न करताच नेण्याचा डाव राष्ट्रवादीने उधळला

Share

नाशिक : मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करणे आवश्यक असते. मात्र मतदान केंद्रावरील प्रमुखांनी इव्हीएम आणि व्हीव्ही पॅट सील सील न करताच मतमोजणी केंद्रावर घेऊन जात होते. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांनी जाब विचारताच केंद्रप्रमुखांनी इव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीनला सीलबंद करत मतमोजणी केंद्रावर नेण्यात आले.

दरम्यान काल विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया राज्यभरात पार पडली. यावेळी अनेक ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या तक्रारी देखील झाल्या. परंतु तात्काळ मशिन्स बदलवत मतदान सुरु करण्यात आले. भगूर येथील नवीन मराठी शाळेत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर येथील केंद्रप्रमुख मशिन्स सील न करताच परस्पर स्ट्रॉंग रूमवर नेणार होते.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रेरणा बलकवडे यांनी विरोध करत मशिन्स सील करून नेण्यास सांगितले. परंतु वरून आदेश असल्याने आम्ही सील न करताच मशीन्स घेऊन जाणार आहोत, असे केंद्रप्रमुखांनी सांगितले. यावेळी बलकवडे यांनी लेखी देण्यास सांगितले परंतु वरिष्ठांनी देखील लेखी देणार नाही, असे उत्तर दिले.

यानंतर बलकवडे यांनी आक्रमक पवित्रा घेत लेखी तक्रार करत इव्हीएम व व्हीव्ही पॅट सीलबंद करण्यास सांगितले. यावेळी केंद्रप्रमुखांनी नमते घेत मशिन्स सीलबंद केले. यानंतर देवळालीतील काही मतदान केंद्रावर असाच प्रकार निदर्शनास आल्यानंतर येथेही अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यानंतर मशीन्सना सीलबंद करण्यात येऊन केंद्रप्रमुखांनी काढता पाय घेतला.

मतमोजणी केंद्रावर जॅमर बसवण्यात यावे. यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हे काम केले पाहिजे. जॅमर बसवल्यामुळे मतमोजणीला पारदर्शकता येईल. साहजिकच निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईल.
-प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!