Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी-त्र्यंबकमध्ये १७ टक्के मतदान; सोमनाथ नगरवासियांचा बहिष्कार मागे

Share

त्र्यंबकेश्वर : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदासंघात सकाळी ७ वाजेपासून १७ टक्के मतदान झाले असून तालुक्यताही सोमनाथ नगर येथील मतदारांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला येथील मतदान सुरळीत चालू आहे.

सकाळच्या हंगल वातावरणानंतर येथील मतदारांनी घराबाहेर पडण्यास सुरवात केली आहे. तसेच आता ऊन पडले असल्याने मतदारांचा ओघही सुरु झाला आहे. दरम्यान तालुक्यातील सोमनाथ नगर येथील नागरिकांनी विविध मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता. साधारण ५०० चाय आसपास येथील लोकसंख्या असून सकाळी निवडणूक केंद्र अधिकारी यांना ही बाब कळताच यंत्रणेची धावपळ उडाली.

तात्काळ तहसीदार दीपक गिरासे यांचे प्रतिनिधी, गट विकास अधिकरी मधुकर मुरकुटे व डीवायएसपी भीमाशंकर ढोले या सरकारी यंत्रणेने ग्रामस्थाना बहिष्कार मागे घ्या अशी विनंती करीत मतदानाचे महत्व पटवून देत ही बहिष्कार मागे घेण्यात आल्याने मतदान सुरु झाले अन कर्मचाऱ्यांनी सुटेकचा निश्वास सोडला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!