Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मध्ये काँग्रेसची हॅट्रिक कि गावितांचे परिवर्तन

Share

त्र्यंबकेश्वर : इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदार संघात अल्प मताधिक्याने निसटता विजय विजयी उमेदवाराचा होणार आहे, पण काँगेस आघाडीचे हिरामण खोसकर की शिवसेनेच्या निर्मला गावीत यांचा हा प्रश्न मतदार संघात चर्चेत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणूक निकाल उद्या लागणार असून या निकालाअंती या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. निर्मला गावित यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली तर त्यांना राज्य मंत्री पद मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. तर हिरामण खोसकर निवडून आले तर या मतदार संघातील काँग्रेसचे वर्चस्व कायम राहणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे ६५ टक्के मतदान झालेले आहे. मागील निवडणुकीत १०३३७ च्या फरकाने आमदार निर्मला गावात निवडून आल्या होत्या. साधारण ५० हजार मते मिळवणारा उमेदवार या ठिकाणी विजय मिळवतो, हा येथील विजयी फॅक्टर आहे. त्यामुळे यंदा हिरामण खोसक्र यांच्या पारड्यात इतकी मते मिळतील का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या प्रसिद्धीमुळे वर फिरल्याची चर्चा या मतदारसंघात आहे. आणि महत्वाचे म्हणजे निर्मला गावित या गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होत्या. यंदा त्यांनी धनुष्यबाण हाताशी धरत काँग्रेसला हात दाखवला. परिणामी काँग्रेसने राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर यांना जवळ करत उमेदवारी दिली. खोसकर हे स्थानिक असून त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने काँग्रेस हॅट्रिक साधणार का, याची सर्वाना उत्सुकता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!