Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा २०१९ : रोजगारासाठी आलेल्या मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई

Share

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे मतदान उद्या होत असून रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी स्पेशल व्यवस्था केल्याचे दिसून आले.

दरम्यान शेतीची कामे आटोपल्यानंतर जिल्ह्यातील आदिवासी भागातील नागरिकांनी शहराकडे तसेच विकसित तालुक्यांत रोजगार निमित्त स्थलांतर केले होते. पंरतु उद्यावर आलेल्या मतदानासाठी हे मतदार हलगर्जीपणा करत असल्याने उमेदवारांनी पुढाकार घेत त्यांना मतदानासाठी गावी आणण्यात येत आहे. यासाठी उमेदवार वाहनाचा खर्च, दिवसाची मजुरी देखील या मतदारांना देत आहेत. यामुळे मतदानाचा टक्का वाढणार असून उमेदवारांच्या मतदानावर परिणाम होणार आहे.

साधारण अतिदुर्गम भागातील नागरिक पावसाळा संपला की रोजगाराच्या शोधात निफाड ,पिंपळगाव, लासलगाव आदी गावांकडे द्राक्ष बागेतील कामासाठी व बाजरी सोंगणी(कापणी),सोयाबीन, मका तोडणे यासाठी जात असतात. आपली पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या संख्येने गावागावातील नागरिक स्थलांतर होत असतात. उद्या मतदान होणार असल्याने स्थलांतर झालेल्या नागरिकांना विविध पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार स्वखर्चाने आणण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!