Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा; तलाठी व कोतवाल दोघे निलंबित!

Share

खामखेडा : विधानसभा निवडणुकीच्या कामात अक्षम्य दिरंगाई केल्याने चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील तलाठी व बहादूरी येथील कोतवाल या दोघांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर रोजी निवडणूक कर्तव्यात नेमलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली होती यावेळी दरेगाव येथील तलाठी व्ही.आर.परदेशी हे उशिराने हजर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी निवडणूक कामकाज गांभीर्याने घेण्याच्या तोंडी सूचनाही दिल्या होत्या.यापूर्वी देखील परदेशी यांना त्यांना नेमून दिलेल्या शासकीय कामकाजाबाबत सूचना देवुनही टाळाटाळ व दिरंगाई केल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच यंत्रे कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रावर मॉकपोल करणेकमी देखील आदेशीत केले असता ते गैरहजर होते.

तसेच बहादूरी येथील कोतवाल पी.बी.पाटील यांची मतदान यंत्रे सिलिंग व सिटिंग वेळी यंत्राची ने-आण करणेकामी १४ आणि १५ ऑक्टोबर या दोन दिवस नेमणूक करण्यात आली होती.परंतु पाटील हे पहिल्याच दिवशी गैरहजर होते.

या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कृतीमुळे निवडणूक कामात अडथळा आल्याने त्यांची शासकीय कामात दिरंगाई लक्षात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी निवडणूक कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केल्याची कारवाई केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!