Type to search

Breaking News मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

निफाड : शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा वेग घड्याळाने रोखला; अनिल कदमांचा बनकरांकडून पराभव

Share

निफाड : तब्बल दोन पंचवार्षिक विजयापासून वंचित ठेवणाऱ्या अनिल कदम यांना धूळ चरत राष्ट्रवादीचे दिलीप बनकर निफ़ाड नवनिर्वाचित आमदार झाले आहे. एकूणच या मतदारसंघांचा निकाल धक्कादायक लागला आहे. राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी ९६ हजार ६० मते मिळाली तर शिवसेनेच्या अनिल कदम यांना ७८ हजार ४४८ मते मिळाली. अनिल कदम यांना १७ हजार ६६८ मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

दरम्यान गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात आमदार अनिल कदम यांनी जम बसवला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत बनकर यांनी वचपा काढत अनिल कदम यांना बदल हवा असे संकेत दिले.

या मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता २००९मध्ये मंदाकिनी कदम यांचे पुतणे अनिल कदम यांनी दिलीप बनकर यांचा पराभव करत विधानभवनात प्रवेश केला. २०१४ मध्ये देखील त्यांनी बनकरांचा पराभव करत आपला गड राखला. परंतु यावेळी बनकर यांनी जोरदार कस लावत अनिल कदम यांना प्रचंड मताधिक्याने पराभूत केले. बहुजन विकास आघाडीकडून असलेले यतीन कदम अनुक्रमके तिसऱ्या आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष विष्णू अहिरराव चौथ्या क्रमांकावर राहिले. दरम्यान दोन पंचवार्षिक वाट बघणाऱ्या बनकर समर्थकांनी समर्थकांनी विजयाचा जोरदार जल्लोष केला.

उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत
■ विजयी – दिलीप बनकर,काँग्रेस : ९६३५४

पराभूत
■ अनिल कदम , शिवसेना : ७८६८६
■ यतीन कदम, बहुजन विकास आघाडी : २४०४६ 
■ संतोष विष्णू अहिरराव, वंचित बहुजन आघाडी : २०६१
■ नोटा : १२२१
■ पोस्टल मते : ४५६ 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!