Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

कळवण : माकपचे जेपी गावित यांचा धक्कादायक पराभव; ए. टी. पवार यांचे पुत्र नितीन पवार विजयी

Share

कळवण : कळवण- सुरगाणा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला असून माकपचे आमदार असलेले जिवा पांडू गावित यांचा पराभव करण्यात आला आहे. ए. टी. पवार यांचे पुत्र नितीन पवार यांनी माकपचे जेपी गावित यांच्या विजयी घौडदौड रोखली आहे. नितीन पवार यांना ८२३४३ मते मिळाली असून गावित यांचा ७ हजार मतांच्या फराके पराभव केला आहे.

दरम्यान कळवण-सुरगाणा मतदारसंघात माकपकडून जे. पी. गावित पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी सज्ज झाले होते. परंतु राष्ट्रवादीकडून नितीन पवार यांनी जोरदार लढत देत माजी मंत्री कै. ए. टी. पवार यांच्या पराभवाचा बदला घेतला आहे.

सुरगाणा व कळवण या दोन तालुक्यांचा मिळून असलेल्या कळवणवर लाल बावटा कायम राहणार की पवार कुटुंबाला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळणार याकडे अवघ्या जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या.

परंतु आता नितीन पवार यांनी वर्चस्व दाखवत विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे मोहन गांगुर्डे अनुक्रमे तिसऱ्या आणि मनसेकडून राजेंद्र लक्ष्मण ठाकरे चौथ्या क्रमांकावर राहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!