Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

‘हे’ आहेत जिल्ह्यातील विद्यमान आमदार; विजयाची औपचारिकता बाकी

Share

नाशिक : सकाळी आठ वाजेपासून विधानसभा निवडणुकीचा निकालाची घोषणा होत असून यामध्ये जिल्ह्यातील मतदारसंघ मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात अंतिम निकाल हाती येणार आहे.

दरम्यान अवघ्या काही फेऱ्या शिल्लक असून नाशिक शहरातील देवळाली, नाशिक मध्य , नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व मतरदारसंघातील विजयी उमेदवार थोड्याच वेळात घोषित करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक मध्य मध्ये डॉ. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरे, नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले, तर देवळालीमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांचा विभाज्य निश्चित मानला जात आहे.

तर ग्रामीणमध्ये दिंडोरीतून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, कळवण मध्ये राष्ट्रवादीचे नितीन पवार, इगतपुरी मध्ये कॉंग्रेसचे हिरामण खोसकर, देवळा राहुल आहेर, बागलाण मध्ये दिलीप बोरसे, निफाड मध्ये दिलीप बनकर, येवलामध्ये छगन भुजबळ, नांदगावमध्ये सुहास कांदे, मालेगाव मध्य मध्ये एमआयएमचे मौलाना मुफ्ती, मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे हे संभाव्य विजयी उमेदवार आहेत. म्हणजेच विजयाची औपचारिकता बाकी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!