Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसची हॅटट्रिक ; हिरामण खोसकर यांचा 31 हजार मतांनी विजय

Share

घोटी : अखेर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीने सलग तिसऱ्यांदा हॅटट्रिक मारली. काँग्रेस महाआघाडीचे हिरामण खोसकर यांनी विद्यमान आमदार निर्मला गावित यांचा 31555 मतांनी एकतर्फी पराभव केला.

सुरुवातीला निर्मला गावित यांच्याकडे एकतर्फी झुकलेली ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे संकेत कुचकामी ठरले. हिरामण खोसकर यांनी गावित यांना एकतर्फी लढत देऊन एकतर्फी विजय संपादन केला. निर्मला गावित यांना फाजील आत्मविश्वास आणि शिवसेनेत केलेले पक्षांतर नडले.

सलग दोन पंचवार्षिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात निर्मला गावित यांनी प्रतिनिधित्व केले. यंदा गावित तिसऱ्या हॅटट्रिक साठी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी मधून काँग्रेसमध्ये हिरामण खोसकर यांनी प्रवेश करून उमेदवारी केली. आज नाशिकला झालेल्या मतदान मोजणीत हिरामण खोसकर यांना 86561 मते मिळाली.

निर्मला गावित यांना 55006 मते मिळाली. खोसकर यांनी गावित यांचा 31555 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर चालू शकला नाही. मतदारसंघात इंदिरा काँग्रेसने मात्र हॅटट्रिक मारली.खोसकर यांच्या समर्थकांनी विजयाचा जोरदार जल्लोष केला.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील नागरिकांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहील. सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो.
– हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर

जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. जनतेच्या सेवेसाठी मी केलेले काम अविरतपणे सुरूच ठेवील. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम नागरिकांचे मी आभार मानते.
– निर्मला गावित, पराभूत उमेदवार

उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत
■ विजयी – हिरामण खोसकर,काँग्रेस : 86561

पराभूत
■ निर्मला गावित, शिवसेना : 55006
■ लकी जाधव, वंचित बहुजन आघाडी : 9975
■ योगेश शेवरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना : 6566
■ शिवराम खाणे, भारतीय ट्रायबल पार्टी : 1461
■ दत्तात्रय नारळे, अपक्ष 767
■ यशवंत पारधी, अपक्ष 1278
■ विकास शेंगाळ, अपक्ष 1110
■ शैला झोले, अपक्ष 1506
■ नोटा : 3059
■ पोस्टल अवैध – 47

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!