Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात काँग्रेसची हॅट्रिक; मतदारांनी गावितांना नाकारले

Share

इगतपुरी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील मतदारांनी हिरामण खोसकर यांना कौल दिल्याचे दिसून येत आहे. एकूणच हिरामण खोसकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

दरम्यान सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच हिरामण खोसकर यांना लीड मिळत होता. साधारण दहाव्या फेरीनंतर हा लीड वाढत जाऊन विजयासमीप पोहचला आहे. त्यामुळे काँग्रेसची हॅट्रिक निश्चित असली तरी मतदारांनी उमेदवार बदलल्याचे चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार असलेल्या निर्मला गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्याने नाराज झालेल्या मतदारांनी नव्या दमाच्या हिरामण खोसकर यांना संधी दिली असल्याचे बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!