Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

दिंडोरी : नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा गड राखला; शिवसेनेच्या पदरी निराशा

Share

दिंडोरी : दिंडीरी पेठ विधानसभा मतदारसंघात पुन्हा आमदार नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा गड राखला आहे. शिवसेनेच्या भासकर गावित यांना धुळ चारत, विजयाचा झेडां रोवला आहे. नरहरी झिरवाळ यांना १२४०८४ मते मिळली तर भासकर गावित यांना ६३५४२ मते मिळाली . साधारण ६०५४२ च्या फरकाने नरहरी झिरवाळ यांनी भासकर गावित यांचा पराभव केला.

दरम्यान निकालाच्या सुरवातीपासूनच नरहरी झिरवाळ यांनी ३ हजार मतांची घेतली होती. ती वाढत जाऊन शेवटपर्यत टिकून होती. त्यामुळे शिवसेनेच्या भास्कर गावित यांना हा आकडा पार करता आला नाही. परिणामी नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा विजयश्री खेचुन आणली.

दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा २००९मध्ये शिवसेनेकडे होता. परंतु त्यानंतर २०१४मध्ये नरहरी झिरवाळ यांनी विजयाचा झेंडा रोवला. यावेळी शिवसेनेतील अंतर्गत कलह, दिंडोरी पेठ प्रांतवाद यामुळे नरहरी झिरवाळ यांना पुन्हा फायदा झाल्याने दिंडोरीची आमदारकी त्यांनी सार्थ ठरवली.

मागील पार्श्वभूमी लक्षात घेता विधानसभेच्या २००४च्या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते असलेला हा मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या ताब्यात गेला. त्यावेळी सेनेच्या धनराज महाले यांनी आपला वरचष्मा या मतदारसंघवर ठेवला. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची जरी हवा होती तरी देखील तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधत नरहरी झिरवाळ यांनी विजयश्री खेचुन आणली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!