Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

चांदवड-देवळामध्ये ‘शिरीष’ कोमेजला; डॉ.राहुल आहेर पुन्हा विजयी

Share

चांदवड : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. राहुल आहेर पुन्हा एकदा विजयी झाले असून काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांचा प्रभाव झाला आहे. त्यामुळे देवळा-चांदवड या प्रांतवादावर ही निवडणूक झाली असली तरी शेवटच्या टप्प्यात प्रांतपाद निष्फळ ठरल्याने डॉ. राहुल आहेर यांना फायदा झाल्याचे चित्र दिसून आले.

डॉ. राहुल आहेर यांना १००५६० मते मिळाली तर शिरीष कोतवाल यांना ७४२२० मते मिळाली म्हणजेच २६३४० मतांनी डॉ. राहुल आहेर निवडून आले.

दरम्यान माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे पुत्र म्हणून २०१४ मध्ये भाजपच्या चिन्हावर आमदार झालेल्या डॉ.राहुल आहेर यांना कुटुंबाचा मोठा राजकीय वारसा मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण देवळा चांदवड मतदारसंघावर आहेर कुटुंबाने आपला वरचष्मा ठेवला आहे. परंतु डॉ. आहेर याना यावेळी हि निवडणूक जड झाल्याचे दिसून येत होते कारण पुन्हा काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांचे तगडे आव्हान होते. कारण गतवेळी मोदी लाट असताना काट्याची लढाई पहायला मिळाली होती. डॉ.आहेर हे जेमतेम 11 हजार मतांनी कसेबसे निवडूण आले होते.

परंतु पुन्हा एकदा देवळा चांदवड मतदारसंघातील जनतेने डॉ.राहुल आहेर याना कौल दिला असून पुन्हा डॉ. आहेर यांची तोफ विधानसभवनात धडाडणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!