Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

राज्यात चर्चा पराभूत झालेल्या ‘त्या आठ’ मंत्र्यांची

Share

नाशिक : राज्यातील नव्या विधानसभेच्या सर्व २८८ जागांचे निकाल लागले असून या निवडणुकीत राजकीय भूकंप झाल्याचे चित्र काही जागांवर पाहायला मिळाले. यामध्ये मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना अनाकलनीय पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान या निकालानंतर या सरकारमध्ये असलेले तब्बल आठ मंत्र्यांचा पराभव करण्यात आला आहे. यातील पहिला नाव चर्चेत आहे ते म्हणजे परळीतील पंकजा मुंडे यांचा प्रभाव होय. फडणवीस सरकारमध्ये त्या ग्रामविकास मंत्री त्या कॅबिनेटमंत्री देखील होत्या. आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्याविरोधात धनंजय मुंडे हे होते. निकालापूर्वी या दोघांमध्ये तुंबळ राजकीय युद्ध पाहावयास मिळाले. दुसरा पराभव म्हणजे निवडणुकीच्यातोंडावर शिवसेनेत प्रवेश करणारे जयदत्त क्षीरसागर होय. या मंत्रिमंडळात ते रोजगार आणि फलोत्पदान मंत्री होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

त्यानंतर सर्वात महत्वाचा पराभव मानला जातोय तो म्हणजे प्रा. राम शिंदे यांचा. प्रा. राम शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी केला आहे. रॅम शिंदे हे राज्यमंत्री होते. त्यानंतर त्याची काम पाहून कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना बढती मिळाली. हे सर्व असतांना कर्जत जामखेडमधून त्यांना शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

भाजपने उमेदवारी नाकारलेल्या सुनील शेळके यांनी पर्यावरणमंत्री संजय भेगडे यांचा पराभव केला आहे. सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीकडून लढत भाजपाला धक्का दिला आहे. तब्बल ३५ वर्ष या मतदारसंघात भाजपाची सत्ता होती. परंतु या पराभवानंतर त्या सत्तेला सुरुंग लागला आहे. त्यानंतर पुरंदरमधून शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांचा पराभव काँग्रेसचे संजय जगताप यांनी केला आहे. साकोली येथून आदिवासी विकासमंत्री परिणय फुके यांचा देखील पराभव स्वीकारावा लागला आहे त्यांचा पराभव नाना काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे.

मराठवाड्यातील शिवसेनेचे अर्जुन खोतकर जालनातून उभे होते. त्यांचा पराभव काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी केला. भाजपचे आणखी महत्वाचे नेते म्हणजे अनिल गोटे हे कृषिमंत्री होते. त्यांचा स्वाभिमानी पक्षाचे देवेंद भुयार यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी कार्यकर्त्याने शेतकरी मंत्र्यांचा पराभव करणे चर्चेचे ठरले.

एकूणच या विधानसभा निवडणुकीत महत्वाच्या नेत्यांना धूळ चारत आमदारकीचे व मंत्री होण्याचे स्वप्न या विजयी उमेदवारांनी भंग केल्याचे दिसून आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!