Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा २०१९ : मतदारांचा मतदानासाठी निरुत्साह पण दिवाळी खरेदीसाठी उत्साह

Share

नाशिक : विधानसभा निवडणूक मतदानासाठी काही अवधी शिल्लक असून मतदारांचा उत्साह अद्यापही कमी दिसून येत आहे. परंतु शहरातील मतदारांचा उत्साह दिवाळी खरेदीसाठी अधिक दिसून आला.

दरम्यान गेल्या महिनाभरापासून विधानसभेचे बुगल वाजले आहे. आज त्यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी मतदारांचा उत्साह तसेच जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये मतदान जनजागृती, पथनाट्य, रांगोळी, विविध स्पर्धा अशा अनेक माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. परंतु लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या मतदानासाठी देखील मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला.

ऐन दिवाळीच्या काळात हे मतदान होत असून हा आठवडा दीपोत्सवाची असल्याने शहरात जोरदार तयारी चालू आहे. या दरम्यान मतदान आल्याने मतदार मतदान करण्यासाठी कमी आणि दिवाळी खरेदी करतांना अधिक दिसून आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!