Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगावमधून सुहास कांदे आणि पंकज भुजबळ यांच्यात सरळ लढत

Share

नाशिक : राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली असून नाशिक जिल्ह्यातील दिंडीरो पेठ मतदारसंघातून दिपक नरहरी झिरवाळ, रामदास चारोस्कर तर नांदगाव मतदासंघातून संजय पवार यांनी माघार घेतली आहे. यामुळे उमेदवारीसाठी काही तास शिल्लक असून लवकरच जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान आज माघारीचा शेवटचा दिवस असून उद्यापासून प्रचाराचा गुलाल उधळला जाणार आहे. यावेळी दिंडोरी-पेठ विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार दिपक नरहरी झिरवाळ यांनी माघार घेतली असून याठिकाणी धनराज महाले अपक्ष, रामदास चारोस्कर अपक्ष, राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात सामना होणार असल्याची चर्चा आहे.

तर नांदगाव मधून माजी आमदार संजय पवार यांनी माघार घेतली असून शिवसेनेचे सुहास कांदे , राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यात लढत होणार आहे. वंचित आघाडीकडून राजाभाऊ पगारे हे देखील रिंगणात उभे आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!