Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चार दिवसात २७ लाख वोटर स्लिप वाटण्याचे आव्हान

Share

नाशिक । विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून मतदारांना घरोघरी जाऊन वोटर स्लिप वाटण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील 15 मतदारसंघात आतापर्यंत 18 लाख 17 हजार 676 वोटर स्लिप वाटण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवसात 27 लाख वोटर स्लिप मतदारांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान निवडणूक शाखेपुढे आहे.

निवडणुकीचे रण तापले असून राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रिया सुरळित व पारदर्शक पध्दतीने पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाचे 30 हजार कर्मचारी रात्रंदिवस एक करीत आहे. ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्राची सरमिसळ प्रक्रिया, कर्मचार्‍यांना निवडणुकीचे प्रशिक्षण, साहित्य वाटप आदी तयारी पूर्ण झाली असून प्रशासनाकडून रंगीत तालिम सुरु आहे. मतदान प्रक्रियेत मतदार हा सर्वात महत्वपूर्ण घटक आहे.

जिल्हयातील 15 मतदारसंघामंध्ये 45 लाख 44 हजार 641 इतके मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव शोधण्यात मतदारांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा यादीत नाव शोधण्यासाठी मतदान केंद्रावर तासंतास ताटकाळावे लागते. नाव सापडत नसल्याने मतदारांना मनस्ताप सहन करण्याची वेळ येतेे. या सर्व वेळखाऊ प्रक्रियेतून मतदारांची सुटका व्हावी यासाठी निवडणूक शाखेकडून मतदारांना निवडणुकीपुर्वी वोटर स्लिपचे वाटप केले जाते.

यंदा देखील निवडणूक शाखेकडून मतदारांना वोटर स्लिप वाटण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. बूथ लेवल ऑफिसरच्या माध्यमातून हे काम केले जाते. जिल्ह्यातील 45 लाख मतदारांपैकी 18 लाख 17 हजार मतदारांच्या घरापर्यंत पोहचून वोटर स्लिप वाटल्या आहे. येत्या सोमवारी (दि.21) मतदान होणार असून त्यासाठी अवघा चार दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या कालावधीत उर्वरीत 27 लाख 26 हजार मतदारांना वोटर स्लिप वाटावे लागणार आहे. त्यासाठी निवडणूक शाखेकडून युध्दपातळीवर यंत्रणा राबविली जात आहे.

नाशिक पश्चिम सर्वाधिक वाटप
नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 55 हजार 581 स्लिपचे वाटप झाले आहे. तर, सर्वात कमी देवळाली मतदारसंघात 1 लाख 5 हजार 491 इतक्या स्लिप वाटल्या गेल्या आहेत. सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर वोटर स्लिप असणार आहे. त्यात मतदारांचे छायाचित्र, जन्मतारीख, वय, पत्ता, लिंग आदीची माहिती असेल.

मतदारसंघनिहाय वोटर स्लिप वाटप
नांदगाव – 1,29,156
मालेगाव मध्य – 1,13,725
मालेगाव बाह्य – 1,35,628
बागलाण – 1,10,408
कळवण – 1,09,698
चांदवड – 1,65,538
येवला – 1,20,985
सिन्नर – 1,21, 531
निफाड – 1,10,430
दिंडोरी – 1,24,228
नाशिक पूर्व – 1,38,178
नाशिक मध्य – 1,23,942
नाशिक पश्चिम – 1,55,581
देवळाली – 1,05,491
इगतपुरी – 1,06,282

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!