Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन

Share

इंदिरानगर : निवडणुकीत परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततेत पार पाडावी व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी ( दि. १६) बुधवार रोजी सकाळी दहा वाजता चार्वाक चौक येथून सशस्त्र संचलन करण्यात आले.

यावेळी शहरातून सुरुवात करण्यात येऊन सावरकर चौक, कलानगर चौक, वडाळा गाव, मांगीर बाबा चौक, पांढरी आई चौक, खंडोबा चौक, हनुमान मंदिर, माळी गल्ली, राजवाडासह परिसरातून काढण्यात आली.

याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय खरात, साहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक पी डी पाटील, सह दंगा काबू पथक, एस आर पी, पोलीस कर्मचारी आदीनी सहभागी घेतला

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन यावेळी वपोनी महेंद्र चव्हाण यांनी केले,

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!