Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

जिल्ह्यात तीन तासांत ६.५० टक्के मतदान; मतदारांचा ओघ सुरु

Share

नाशिक : विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान होत असून जिल्ह्यात सकाळपासून तासांत सहा टक्के मतदान झाले आहे. दरम्यान पावसाच्या सावटामुळे काही ठिकाणी मतदार उशिरा घराबाहेर पडत आहेत.

सकाळी सात वाजेल मतदान सुरु झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर येणाऱ्यांचा ओघ खूपच कमी होता. या तीन तासांत जिल्ह्यातील मतदार केंद्रावर अवघे सहा टक्के मतदान झाले.

ग्रामीण मतदासंघापैकी कळवण – सुरगाणा मतदार संघात ७ ते ९ या दोन तासात ८. ७४% मतदान, बागलाण – ३.७८%, निफाड मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५. ४६% मतदान, तर नाशिक पश्चिम मतदार संघात सकाळी ७ ते ९ यावेळच्या ३.६% टक्के मतदान, सिन्नरला ३.११% मतदान झाले आहे. मात्र काही ठिकाणी पावसाच्या सावटामुळे पहिल्या दोन तासांत मतदारांनी निरुत्साह दाखवला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!