Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

26 हजार मयत, दुबार मतदारांची नावे वगळली

Share

नाशिक । प्रतिनिधी
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची निवडणूक शाखेने जोरदार तयारी सुरू केली असून मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील 15 मतदारसंघांतील 26 हजार दुबार व मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. अजून 25 हजार नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेने तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील मतदार याद्या शुध्दीकरणाचे काम झाले होते. मात्र मतदानावेळी यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या.

ते बघात निवडणूक शाखेने मतदार याद्या शुद्धीकरणाच्या कामाला प्राथमिकता दिली आहे. जिल्ह्यातील 15 मतदारसंघांत साधारणत: 20 लाख मतदार आहेत. यादी शुद्धीकरणात 26 हजार दुबार तसेच मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये सिन्नर मतदारसंघात सर्वाधिक 5 हजार 730 दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत. त्याखालोखाल चांदवडमध्ये 3942, दिंडोरीत 3807, मालेगाव मध्यमध्ये 2958 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. काही मतदारसंघांमध्ये हे काम धिम्या गतीने सुरू असून आणखी 25 हजार नावे वगळली जाऊ शकतात.

विधानसभा मतदारसंघ
वगळलेल्या नावांची संख्या
नांदगाव – 1927
मालेगाव मध्य – 2958
मालेगाव बाह्य – 2081
बागलाण – 434
कळवण – 1121
चांदवड – 3942
येवला – 2052
सिन्नर – 5730
निफाड – 100
दिंडोरी- 3807
नाशिक पूर्व – 337
नाशिक मध्य – 463
नाशिक पश्चिम – 414
देवळाली – 117
इगतपुरी – 818
एकूण – 26 हजार 301

मतदार याद्या शुद्धीकरणाचे काम निवडणूक शाखेकडून सुरू आहे. तब्बल 26 हजार मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
– अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!