Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ०९ उमेदवारी अर्ज बाद

Share

नाशिक : राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून काल (दि.०४ ) रोजी जिल्हाभरात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात उमेदवार व्यस्त दिसून आले. यानंतर आज अर्जांची छाननी होत असून नाशिक जिल्ह्यात आतापर्यत 09 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून एकूण पंधरा उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात डॉक्टर राजेंद्र विठ्ठलराव धनवटे यांचा अर्ज आज छाननी दरम्यान अवैध ठरवण्यात आला. त्यांनी स्वाक्षरी केलेली नव्हती तसेच डिपॉझिट भरलेले नव्हते शपथही घेतली नाही, प्रतिज्ञापत्र देखील दाखल केलेले नाही. त्यामुळे या मतदार संघात आता 15 पैकी 14 उमेदवार उरले आहेत.

नाशिक पश्चिम मतदार संघात एकूण तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यात तानाजी जायभावे यांचा माकप कडून डमी अर्ज दाखल झालेला होता. त्यामुळे हा अर्ज बाद ठरवण्यात आला एकूण तीस उमेदवारांपैकी 29 उमेदवार पात्र ठरले असून एक अर्ज अवैध ठरला आहे.

नाशिक मध्य मतदार संघात एकूण 12 अर्ज दाखल झाले होते. त्यात गीता नितीन भोसले यांचा डमी अर्ज असल्याने तो बाद ठरवला तर भागवत कांबळे यांनी सूचक हे मतदारसंघातील दिले नाही. त्यांनी ९ सूचक बाहेरील दिले होते. त्यामुळे त्यांचाही अर्ज अवैध ठरविण्यात आला एकूण बारा उमेदवारांपैकी या मतदारसंघात आता दहा उमेदवार शिल्लक राहिले आहेत त्यात चार अपक्ष व सहा पक्षाचे उमेदवार आहेत.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात एकूण 14 उमेदवार होते त्यात दोन अपात्र ठरवण्यात आले आता बारा उमेदवार आहेत यात अशोक किसन झोले यांचा अर्ज अवैध ठरला आहे त्यांनी दहापैकी आठच सूचक दिले होते तसेच पोपट दामू वाघ भारतीय ट्रायबल पार्टी यांचा डमी अर्ज असल्याने तोही अवैध ठरविण्यात आला आहे.

तसेच मालेगाव मध्यमध्ये एकूण १९ उमेदवारांपैकी १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र वैध तर पाच उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आलेली आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!