Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भाजप भाकरी फिरविण्याच्या तयारीत : पक्षाचा अंतर्गत सर्व्हे

Share

नाशिक । कुंदन राजपूत
विधानसभेचे शहरातील नाशिकमध्य, पूर्व व पश्चिम हे तिन्ही मतदारसंघ विद्यमान आमदारांना सलग दुसर्‍यांदा आमदारकीचा सोपान चढण्याची संधी देत नाहीत. 2009 मध्ये या तिन्ही मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यावेळी नवख्या मनसेचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून गेले. मात्र, 2014 च्या निवडणुकीत नाशिककरांनी सर्वांना घरी बसवले. इतिहासाची ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप भाकरी फिरविणार की विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे धाडस दाखविणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा असो की विधानसभा निवडणूक नेहमी नव्या चेहर्‍यांना संधी देणे हे नाशिककरांचे वैशिष्ट. नाशिककर लाटेवर स्वार होतात, असे देखील गंंमतीने म्हटले जाते. विधानसभा निवडणुकीमुळे नाशिककरांच्या या ‘मूढी’ स्वभावाची चर्चा झाली नाही तर नवलच! 2004 पर्यंत नाशिकमध्य हा एकमेव मतदारसंघ होता. 2009 मध्ये नव्या रचनेत नाशिक मध्य मतदारसंघाचे विभाजन होऊन नाशिक मध्य, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम हे तीन मतदारसंघ अस्तित्त्वात आले.

यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हवा होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या तोफा नाशिकमध्ये अशा काही धडाडल्या की विरोधकांंना सळो की पळो करुन सोडले होते. तिन्ही मतदारसंघात मनसेचे आमदार भरघोस मतांनी निवडून आले. मात्र, त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी त्यांना ‘मूढी’ का म्हणतात याची झलक दाखवली.
यावेळी नाशिककर मोदी लाटेवर स्वार झाले व मनसेच्या तिन्ही विद्यमान आमदारांना घरी पाठवले.

नाशिक मध्य, पूर्व व पश्चिम मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवले. आता पुन्हा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. देशात अजूनही मोदीलाट कायम असून या तिनही मतदारसंघातही भाजपसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे बोलले जाते. मात्र, नाशिककर विद्यमान आमदाराला सलग दुसर्‍यांदा विधानसभेत पाठवण्याचा त्रास घेत नाहीत, हा इतिहास पक्षाला सतावत आहे.

पक्षाच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत तिन्ही विद्यमान आमदारांना रथवार स्वार होण्याची संधी मिळाली. मात्र, तरी देखील उमेदवारीची माळ गळ्यात पडेल की नाही, याबाबत ते साशंक आहे. स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजपसाठी एक एक जागा महत्वाची आहे. नाशिककरांचा मूढी स्वभाव बघता भाजपने या तिन्ही जागांवर भाकरी फिरविण्याची तयारी केल्याचे समजते.

डी.एस.आहेर यांना दुसर्‍यांदा संधी
स्व. डी. एस. आहेर 1985 मध्ये नाशिक मध्य मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांना पराभवाची धुळ चाखावी लागली. त्यानंतर मात्र, 1995 मध्ये पुन्हा ते एकदा आमदार झाले. तसेच 1999 मध्ये दोन्ही काँग्रेस वेगळे लढले होते. मतविभाजनाचा फायदा डॉ. आहेर यांना झाला व सलग दुसर्‍यांदा निवडून आले.

डॉ. बच्छाव यांचा पराभव
नाशिकमध्य मतदारसंघात पहिल्या महिला आमदार होण्याचा मान काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना मिळाला. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे डॉ. आहेर यांंचा पराभव केला. मात्र, पुढील निवडणुकीत मनसेच्या वसंत गिते यांनी डॉ. बच्छाव यांना मात दिली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!