Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये युतीत तंटा; ३६ शिवसेना नगरसेवक, ३५० सेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नाशिक पश्चिम मध्ये बंडखोरी केलेले शिवसेना गटनेते विलास शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांसह साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत. आज शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व नगरसेवक हजर होते, यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेनेच्या बंडखोरीमुळे नाशिक पश्चिममधील भाजची वाट बिकट होणार असून महाराष्ट्रात युती असलेल्या सेना भाजपात नाशिकमध्ये मात्र तंटा निर्माण झाला आहे,.

नाशिक पश्चिम मतदारसंघात युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आलेली असतांना शिवसेनेचे विलास शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे. दरम्यान, शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी ३६ नगरसेवक, दोन महानगर प्रमुख साडे तीनशे पदाधिकारी यांनी आज राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का या मतदारसंघात बसला आहे.

यामुळे नाशिक पश्चिम मध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत यावेळी शक्तीप्रदर्शनच केले. शिवसेना नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून राजीनामे दिल्याची माहिती शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!