Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विधानसभा २०१९ : नाशकात वंचितचा करिष्मा चालणार का?

Share

नाशिक । एमआयएमशी घटस्फोट झाल्यावर वंचितने स्वतंत्रपणे 288 जागांवर विधानसभेची निवडणूक लाढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 288 उमेदवारांना उभे करण्यात आले आहे. शहराचा विचार करता येथील चार पैकी तीन मतदार संघात वंचितचे उमेदवार उभे केले असून लोकसभा निवडणूकीत वंचितने नाशिक लोकसभा मतदार संघात सव्वालाखाहून आधिकची मते घेतली होती.

मात्र मध्यल्या काळात अनेक राजकीय घडामोडी व उलथापालथी झाल्या. त्यामुळे वंचितचे राज्यातील वलय काहिसे कमी झाले. त्यामुळे लोकसभेचा करिष्मा विधानसभा निवडणूकीत घडेल का? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिक शहरातील तिनही मतदार संघात भाजपकडून भाकरी फिरविली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांचे काही लोकही वंचित आघाडीच्या संपर्कात होते. एवढेच नव्हेतर भाजपाचे वसंत गीते आणि सीटूचे डॉ. डी. एल. कराड यांच्यासह अन्य मंडळीही वंचितच्या संपर्कात होते. डॉ. डी. एल. कराड यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीदेखील जाहिर करण्यात आली.

मात्र ते माकपचे आधिकृत उमेदवार झाल्याने त्यांना वंचितने समर्थन दिले. वंचितकडून शहरातील नाशिक पूर्वमधून संतोष नाथ, मध्यमधून संजय साबळे आणि देवळाली मतदार संघातून गौतम वाघ यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांसाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. चारही मतदार संघांमध्ये मराठा, नवबौद्ध, ब्राह्मण, ओबीसी मतदार लक्षणीय आहेत. जयपराजयाच्या समीकरणात नवबौद्ध समाजाचे मते निर्णायक ठरू शकतात.

प्रकाश आंबेडकरांनी जाहिर सभा घेतल्यास त्याचा नक्कीच परिणाम जाणवेल. अ‍ॅड.आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे.
नाशिकमध्येही त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील विद्यमान सरकारविरुध्द समाजात मोठया प्रमाणात नाराजी आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम आंबेडकर यांनी केले होते.

त्यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून पर्याय देखील उपलब्ध करुन दिला. राज्यात लोकसभेला वंचित उमेदवारांनी लाखो मते घेतल्याने आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. त्याची धास्ती दोन्ही काँग्रेसने घेतली होती. त्याच्यासोबत आघाडीचा वंचितला पर्याय होता. मात्र, त्यांनी त्यांचा स्वतंत्र बाणा अबाधित राखत स्वबळावर निवडणूक लढवत आहे. नाशिकमध्येही त्याचे काय परिणाम होता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!