Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विधान सभा २०१९ : सेल्फी क्लिक करत द्या मतदानाचा संदेश; दहा महाविद्यालयात मोहीम

Share

नाशिक । प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा; यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ंया उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये ‘वोट कर नाशिक’कर ही मोहीम राबवली जात आहे. शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये सेल्फी पाईंट तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी तरुणांना मतदानाचा हक्क बजवा असा संदेश तो ही विथ सेल्फी काढून देता येणार आहे. महाविद्यालयामध्ये हा उपक्रम तरुणाईसाठी आकर्षण ठरत आहे.

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला. मतदारांमध्ये त्यांच्या मतदानाचा हक्काबाबत जागृती व्हावी; यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जगजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांचा पुढाकाराने ‘वोट कर नाशिक’कर हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा 60 टक्के मतदान झाले होते.

आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यदा देखील नाशिककरांनी त्यांचे कर्तव्य बजवावे यासाठी जिल्हा प्रशासन जनजागृती उपक्रम राबवित आहे. ‘वोट कर नाशिक’कर या मोहिमेचा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील 15 मतदारसंघात ईव्हीएम, व व्हीव्हीपॅट यंत्राबाबत जनजागृती केली जात आहे. लोकशाहीत तरुण मतदारांची भूमिका सर्वाधिक आहे. जिल्ह्यात 19 ते 29 या वयोगटातील तब्बल 18 लाख मतदार आहेत.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तरुणांना या मोहिमेत सहभागी करुन घेतले जात आहे. त्यासाठी शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये सेल्फी पाईंट तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी विद्यार्थी ‘मी मतदान करणार तुम्ही देखील करा’ हा ंसंदेश देत सेल्फी क्लिक करू शकतात. हा संदेश व सेल्फी ‘वोट कर नाशिक’कर या अ‍ॅपवर अपलोड केली जाईल. तरुणाईच्या माध्यमातून लोकशाहीचा जागर करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

शहरातील दहा महाविद्यालये
पंचवटी लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, के.के.वाघ महाविद्यालय, भुजबळ नॉलेज (आडगाव), वसंत पवार मेडिकल महाविद्यालय, संघवी इंजिनिअरिंग महाविद्यालय, पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग महाविद्यालय, सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, मातोश्री महाविद्यालय, बिटको महाविद्यालय.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!