Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

जिल्ह्यात भाजप मोठा तर शिवसेना लहान भाऊ; भाजपला 5 तर शिवसेनेला 2 जागी विजयी

Share

नाशिक । जिल्ह्यात युतीत जागा वाटपात शिवसेना मोठी तर भाजप लहान भाऊ होता. शिवसेनेने 9 तर भाजपने 6 जागा लढवल्या होत्या. मात्र, कमी जागा लढवूनही भाजपने पाच जागा जिंकल्या; तर सेनेला जादा जागा मिळूनही दोनच जागांवर विजय मिळविता आला. त्यामुळे निवडणुकीनंतर जिल्ह्यात युतीत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे.

कधी काळी राज्य व जिल्ह्यात युतीत शिवसेनाच मोठा भाऊ होता. सेनेच्या कलाने भाजपला चालावे लागायचे. मात्र, 2014 निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण बदलले. मोदी लाटेमुळे गत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 122 जागा जिंकल्या; तर शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर पुढील पाच वर्षे राज्यात भाजप मोठा तर शिवसेना लहान भावाच्या भूमिेकेत आहे. नुुकत्याच झालेल्या निवडणुकीतही हाच ट्रेंड पहायला मिळाला.

निवडणुकीपुर्वी जागा वाटपात भाजपाने 164 तर शिवसेनेने लहान भावाची भूमिका घेत 124 जागा लढवल्या. मात्र, नाशिक जिल्ह्याचा विचार करता 15 जागांपैकी 9 जागा शिवसेनेने तर 6 जागा भाजपने लढवल्या. जिल्ह्यात जागा वाटपात शिवसेना मोठा तर भाजप लहान भावाच्या भूमिकेत होता. मात्र, सेनेला आठ पैकी दोन जागा जिंकता आल्या; तर भाजपने सातपैकी पाच जागा जिंकत यश मिळवले.

त्यामुळे जिल्ह्यात जागा वाटपात मोठा भाऊ ठरलेली शिवसेना कमी जागा जिंकल्यामुळे लहान भाऊ ठरली आहे. जादा जागा जिंकूनही शिवसेनेला यश मिळविता आले नाही. गतवेळी दोन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागा जिंकता आल्या होत्या.

सेनेने जिंकलेल्या जागा
मालेगाव बाह्य, नांदगाव

पराभूत जागा
सिन्नर, येवला, निफाड, दिडोरी, इगतपुरी – त्र्यंबकेश्वर, देवळाली, कळवण – सुरगाणा

भाजपाने जिंकलेल्या जागा
नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, चांदवड – देवळा, बागलाण

पराभूत जागा
मालेगाव. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!