Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

पंचवटी : व्हीलचेअर नसल्याने दिव्यांग मतदारांचे हाल

Share

नाशिक : प्रत्येक मतदान केंद्रात दिव्यांगासाठी व्हिलचिअर ठेवण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश असताना पंचवटीतील आयुर्वेदिक महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर व्हिलचेअर नसल्याने अनेक दिव्यांगाचे हाल झाले. तेथील पोलीस तसेच इतर कर्मचार्‍यांनी साध्या खुर्चीत बसवून त्यांना उचलून न्यावे लागले.

दरम्यान आज राज्यात विधानसभेसाठी आज राज्यात मतदान पार पडत आहे. या दरम्यान दिव्यांगांना मोफत व्हीलचेअरची सोय असताना दुसरीकडे नाशकातील पंचवटी येथे मतदान केंद्रावर व्हील चेअर नसल्याने दिव्यांग उमेदवारांना पोलीस तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहनामध्ये बसविण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर राग व्यक्त केला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!