Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

PhotoGallery : जिल्ह्यात मतदानाला उत्साहात सुरुवात

Share

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या आज सकाळी सातवाजेपासून उत्साहात सुरूवात झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान अनेक मतदार केंद्रांवर पावसाचे सावट असल्याने ग्रामीण भागात मतदारांमध्ये उदासीनता पाहावयास मिळाली.

दरम्यान शहरात पावसाचे वातावरण असतानाही मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. ज्या मतदार केंद्रावर बीएलओ उपलब्ध नसेल त्या ठिकाणी मतदारनाई मोबाईल ऍपच्या माध्यमातून नाव शोधत मतदान केले.

जिल्ह्यात तब्बल ४५ लाख ४४ हजार ६८१ इतके मतदार मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात १४८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात चार हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक उमेदवार १९ हे नाशिक पश्चिम मतदारसंघात उभे आहेत. या ठिकाणी दोन ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!