Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने २२९ मतदान केंद्रावर एक तास उशीरा मतदान सुरु

Share

नाशिक : जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले . एकूण २२९ मतदान केंद्रावर एक तास उशीरा मतदान सुरु झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. यंत्रांमध्ये बिघाड

विधानसभा निवडणुकीचे मतदान राज्यात सुरु असून जिल्हाभरात ठिकठिकाणी मतदान केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असली तरी ऐनवेळी काही ठिकाणी मतदार यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला.

जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत २२९ मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली, यामुळे तब्बल एक तास उशिराने मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. यामुळे मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदार यंत्रे बदलण्यासाठी यंत्रणेला धावपळ करावी लागली.

तर एका बुथवर पक्षाचे चिन्ह असलेल्या वोटर स्लिप दिल्या जात होत्या.त्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या. तर सटाणा येथे मतदार याद्यांचा गोंधळ झाल्याने मतदारांना त्रास सहन करावा लागला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!