Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

नांदगाव : पंकज भुजबळांची विजयी परंपरा खंडित; सुहास कांदेचा धक्कादायक विजय

Share

नांदगाव : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्ह्णून ओळख असलेल्या नांदगाव मतदारसंघामध्ये परिवर्तन झाले असून शिवसेनेने भगवा फडकावला आहे. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी तब्बल १३ हजार ८८९ मतांनी पराभव केला आहे. सुहास कांदे यांना ८४ हजार ९४८ मते मिळाली आहेत.

दरम्यान येवला येथून छगन भुजबळ हे निवडून आले असले तरी नांदगाव मध्ये भुजबळांना धक्का बसला आहे. गेल्या दोन पंचवार्षिक नांदगाव मतदारसंघ पंकज भुजबळ हे विद्यमान आमदार होते. परंतु विधानसभा निवडणुकीत भुजबळ हे नाव हा पराभव रोखू शकले नाही.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पंकज भुजबळ व सुहास कांदे यांच्यात अटीतटीची लढत होती. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत समर्थकांमध्ये गोंधळ होता. परंतु अखेर सुहास कांदे यांनी विजयश्री खेचून आणत नांदगावमध्ये परिवर्तन घडवून आणले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!