Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

खा. डॉ अमोल कोल्हे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर

Share

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहे.

शुक्रवार दि ११ ऑक्टोबर रोजी डॉ. अमोल कोल्हे यांची आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ सकाळी ११ वाजता मुंजवाड ता. बागलाण येथे सभा होणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ दिंडोरी येथे १२.३० वाजता सभा होणार आहे. दुपारी ३ वाजता ऍड.माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सिन्‍नर येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आ.पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ७.३० वाजता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ येवला येथे जाहीर सभा होणार आहे.

दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ कळवाडी ता. मालेगांव येथे जाहीर सभा घेणार आहे. त्यानंतर मालेगाव बाह्यचे उमेदवार डॉ.तुषार शेवाळे व मालेगाव मध्यचे उमेदवार शेख आसिफ शेख यांच्या प्रचारार्थ मालेगांव येथे जाहीर सभा घेणार असून दुपारी १.३० ते ५ या वेळेत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप, पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अपूर्व हिरे व देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरात रोड शो व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!